अमरनाथ गुहेतून बाबा बर्फानीचा पहिला फोटो समोर, यंदा शिवलिंगांची ‘इतकी’ फूट उंची, कधीपासून सुरू होणार यात्रा?

अमरनाथ गुहेतून बाबा बर्फानीचा पहिला फोटो समोर, यंदा शिवलिंगांची ‘इतकी’ फूट उंची, कधीपासून सुरू होणार यात्रा?

| Updated on: May 06, 2025 | 1:32 PM

पहलगाम हल्ल्याचा अद्याप नोंदणींवर कोणताही परिणाम दिसून आलेला नाही. गेल्या वेळीपेक्षा यावेळी जास्त भाविक येण्याची अपेक्षा आहे. ३ जुलैपासून सुरू होणाऱ्या या यात्रेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील पवित्र अमरनाथ गुहेत नैसर्गिकरित्या तयार झालेल्या बर्फाच्या शिवलिंगाचे पहिला फोटो समोर आले आहे. यावेळी शिवलिंगाने मोठा आकार घेतल्याचे पाहायला मिळत आहे. सात फूट उंच बर्फाच्या शिवलिंगाच्या दर्शनासाठी लाखो भाविक काश्मीरच्या अनंतनाग येथे दाखल होणार आहे. अमरनाथ यात्रा ३ जुलैपासून सुरू होणार आहे. ही यात्रा सुमारे ३८ दिवस चालणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र त्याचा अमरनाथ यात्रेवर कोणताही परिणाम होणार नाही, असंही कळतंय. वर्षभर लाखो भाविक अमरनाथ गुहेत नैसर्गिकरित्या तयार झालेल्या बर्फाच्या शिवलिंगाच्या पहिल्या दर्शनासाठी डोळे लावून असतात. अशातच पहिला फोटो समोर येताच भाविकांमध्ये अमरनाथ यात्रेचा उत्साह पाहायला मिळतोय.

अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांचे वय १३ ते ७० वर्षांच्या दरम्यान असावे. यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे. १५ एप्रिलपासून सुमारे ३ लाख ५० हजार भाविकांनी ऑफलाइन आणि ऑनलाइन माध्यमातून अमरनाथ यात्रेसाठी आगाऊ नोंदणी केली आहे.

Published on: May 06, 2025 01:32 PM