आम्ही घरी जाऊन पाठिंबा दिला म्हणून तुम्ही मुख्यमंत्री बनलात… बच्चू कडू यांचे ठाकरेंना प्रत्युत्तर
बच्चू कडू यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या प्रवेशानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्यावर जोरदार टीका केली होती. “मी त्यांना घरी बोलावून मंत्री केलं, ही माझी चूक होती,” असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले होते. तसेच लोभापायी गेलेल्यांना जाऊ द्या, कार्यकर्ते माझ्यासोबत असल्याचेही त्यांनी म्हटले होते. उद्धव ठाकरेंच्या या विधानावर आता बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बच्चू कडू यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या प्रवेशानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्यावर जोरदार टीका केली होती. “मी त्यांना घरी बोलावून मंत्री केलं, ही माझी चूक होती,” असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले होते. तसेच लोभापायी गेलेल्यांना जाऊ द्या, कार्यकर्ते माझ्यासोबत असल्याचेही त्यांनी म्हटले होते. उद्धव ठाकरेंच्या या विधानावर आता बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या मतांमुळे तुम्ही मुख्यमंत्री झालात, आम्ही घरी येऊन तुम्हाला पाठिंबा दिला होता असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
या टीकेला आता बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिले आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, उद्धव साहेबांकडून अशी प्रतिक्रिया अपेक्षित नव्हती. “पहिले ते मुख्यमंत्री झाले की बच्चू कडू राज्यमंत्री झाले, याचे उत्तर त्यांनी द्यावे,” असे त्यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले की, त्यावेळी त्यांच्या पक्षाकडे 2 आमदार होते आणि त्यांनी शिवसेनेविरोधात निवडणूक लढवून विजय मिळवला होता. निवडणुकीनंतर सर्व पक्षांकडून प्रस्ताव होते, मात्र एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक घडवून आणली आणि त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला.
