Bachchu Kadu : दिव्यांग अन् बळीराजासाठी लढणारा नेता मराठीसाठी मैदानात; बच्चू कडू म्हणाले..तर मोर्चात सहभागी होणार

Bachchu Kadu : दिव्यांग अन् बळीराजासाठी लढणारा नेता मराठीसाठी मैदानात; बच्चू कडू म्हणाले..तर मोर्चात सहभागी होणार

| Updated on: Jun 27, 2025 | 7:26 PM

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्ती विरोधात पाच जुलै रोजी मुंबईत संयुक्त मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला वेगवेगळ्या तारखा जाहीर झाल्या असल्या तरी, चर्चेनंतर तारीख पाच जुलैला ठरवण्यात आली. या मोर्चात मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) सहभागी होतील.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात एकत्रित मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. हा मोर्चा पाच जुलै रोजी मुंबईत काढण्यात येणार आहे. सुरुवातीला राज ठाकरे यांनी सहा जुलै आणि उद्धव ठाकरे यांनी सात जुलै रोजी स्वतंत्र मोर्चे काढण्याची घोषणा केली होती. मात्र, मराठी भाषेच्या प्रश्नावर एकत्र येऊन जास्त प्रभावी आंदोलन करण्याच्या उद्देशाने, दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. संजय राऊत यांनी या दोन्ही नेत्यांमध्ये समन्वय साधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आषाढी एकादशी आणि सोमवारच्या सुट्ट्या लक्षात घेऊन पाच जुलै ही तारीख निवडण्यात आली. या मोर्चात मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या कार्यकर्त्यांसह अनेक राजकीय पक्ष, कलाकार आणि साहित्यिक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.

अशातच दिव्यांग आणि बळीराजासाठी कायम लढणारा नेता आता माय मराठीचं अस्तित्व टिकावं म्हणून मैदानात उतरणार आहे. बच्चू कडू यांनी ठाकरे बंधूंना पाठिंबा दर्शवत असे म्हटले की, 5 जुलैला मनसेच्या आंदोलनाला माझा पाठींबा आहे. मला बाळा नांदगावकर यांचा फोन आला होता आणि मोर्चात सहभागी व्हा, असं आव्हान केलं होतं. मी देखील त्या मोर्चात सहभागी होण्याचा प्रयत्न करेल असा शब्द दिल्याचे बच्चू कडू म्हणाले.

Published on: Jun 27, 2025 07:26 PM