Tokyo Olympics 2021: उत्कृष्ठ! पीव्ही सिंधूच्या खिशात कांस्य पदक

Tokyo Olympics 2021: उत्कृष्ठ! पीव्ही सिंधूच्या खिशात कांस्य पदक

| Edited By: | Updated on: Aug 01, 2021 | 7:12 PM

तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात सिंधूने दमदार पुनरागमन करत सामना दोन सरळ सेट्समध्ये जिंकला. तिने जगातील सध्या 9 व्या क्रमांकावर असणाऱ्या ही बिंगजियाओ (He Bingjiao) हिला पहिल्या सेटमध्ये 13-21 आणि दुसऱ्या सेटमध्ये 15-21 ने नमवत कांस्य पदक पटकावलं.

Tokyo Olympics 20-2021 : भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने (PV Sindhu) चीनी ताइपेच्या खेळाडू विरुद्ध सेमीफायनलचा सामना गमावत सुवर्णपदकासह रौप्य पदक मिळवण्याची संधीही गमावली होती. मात्र तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात सिंधूने दमदार पुनरागमन करत सामना दोन सरळ सेट्समध्ये जिंकला. तिने जगातील सध्या 9 व्या क्रमांकावर असणाऱ्या ही बिंगजियाओ (He Bingjiao) हिला पहिल्या सेटमध्ये 13-21 आणि दुसऱ्या सेटमध्ये 15-21 ने नमवत कांस्य पदक पटकावलं.