Nashik Protest : औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन

Nashik Protest : औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन

| Updated on: Mar 17, 2025 | 4:41 PM

Nashik Bajrang Dal Protest : विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून राज्यात सगळीकडे औरंगजेबाची कबर काढून टाकण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे.

औरंगजेबाची कबर हटाओ अशी मोहीम हाती घेत, राज्यभरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या मुघल बादशाह औरंगजेब याच्या कबरीला काढून फेका अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी ठिकठिकाणी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. नाशिक येथे देखील आज बजरंग दल आणि विहंपने आंदोलन करत औरंगजेबाची कबर काढून टाकण्याची मागणी केली आहे. या कबरीच समूळ उच्चाटन झालं पाहिजे यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. नाशिकसह कोल्हापूर, पुणे, मालेगाव येथे देखील आंदोलन करण्यात आलेलं आहे.

Published on: Mar 17, 2025 04:41 PM