बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणार- एकनाथ शिंदे
"बाळासाहेबांचा आशीर्वाद आणि त्यांच्या शुभेच्छांमुळे हे शक्य झालं आहे. त्यांचे विचार आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांनी नेहमीच सर्वसामान्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे," असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“गुरुपौर्णिमेला आम्ही दरवर्षी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक होतो. गुरुपौर्णिमेला प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात एक वेगळी भावना असते. त्यांच्या आशीर्वादामुळेच माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता, शिवसैनिक या राज्याचा मुख्यमंत्री झाला. यामध्ये बाळासाहेबांचा आशीर्वाद आणि त्यांच्या शुभेच्छांमुळे हे शक्य झालं आहे. त्यांचे विचार आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांनी नेहमीच सर्वसामान्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, हे सर्वश्रुत आहे. या राज्याचा सर्वांगिण विकास आमचं सरकार करेल,” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. गुरुपौर्णिमेनिमित्त ते बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक झाले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
Published on: Jul 13, 2022 02:20 PM
