Balochistan : बलुच आर्मीकडून पाकिस्तानी लष्करावर पुन्हा हल्ला, 14 सैनिकांना केलं ठार
Baloch army Attack On Pakistani Army : बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तान लष्कराच्या ताफ्यावर हल्ला चढवला आहे. यात 14 पाकिस्तानी सैनिक ठार झालेले आहेत.
बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तान लष्कराच्या ताफ्यावर हल्ला चढवला आहे. बलुचिस्तानमधील पंजगुर येथे पाकिस्तान लष्करावर हल्ला करण्यात आलेला आहे. या हल्ल्यात 14 पाकिस्तानी लष्करी सैनिक ठार झालेले आहेत. तर अनेकजण जखमी आहे असा दावा बलुच आर्मीकडून करण्यात आलेला आहे. या हल्ल्याची काही दृश्य देखील समोर आलेली आहेत.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर आता बलुचिस्तानने देखील पाकिस्तानला टार्गेट करत सळो की पळो करून सोडलेलं आहे. आज पाकिस्तानच्या लष्कराच्या ताफ्यावर बलुच आर्मीने हल्लाबोल करत 14 पाकिस्तानी सैनिक ठार केलेल आहेत. तर अनेकजण जखमी आहेत, असा दावा बलुच आर्मीकडून करण्यात आलेला आहे. यापूर्वी देखील बलुच आर्मीकडून पाकिस्तानच्या लष्करावर बॉम्ब हल्ला करण्यात आलेला होता.
Published on: May 15, 2025 09:33 AM
