Muhammad Yunus : काम करणं कठीण… बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस राजीनामा देणार? कारण काय?

Muhammad Yunus : काम करणं कठीण… बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस राजीनामा देणार? कारण काय?

| Updated on: May 23, 2025 | 10:18 AM

मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद युनूस यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीत काम करू शकणार नाही अशी भीती व्यक्त केली. जोपर्यंत राजकीय पक्षांकडून एकमत जाहीर नाही तोपर्यंत मी काम करू शकणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

बांगलादेश सध्याच्या राजकीय अस्थिरतेचा सामना करत आहे. तर अंतरिम सरकार पुढील संसदीय निवडणुकांसाठी स्पष्ट रोडमॅप जाहीर करण्यात अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथा-पालथ होण्याची चिन्ह असल्याचे पाहायला मिळत आहे. बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस हे राजीनामा देण्याच्या तयारी असल्याची चर्चा आहे. बांगलादेशमध्ये सध्या असणारी परिस्थिती आणि सध्याच्या वातावरणात काम करू शकत नसल्याचे मोहम्मद युनूस यांनी म्हटले आहे. तर दिवसेंदिवस राजकीय पक्षांसोबत काम करणं कठीण होत चाललंय, असं मत देखील मोहम्मद युनूस यांनी व्यक्त करत मला ओलिस असल्यासारखे वाटत असल्याची भावना बोलून दाखवली आहे.

मोहम्मद युनूस यांच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा सुरू असताना बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-जमान यांनी या वर्षी डिसेंबरपर्यंत निवडणुका घेण्याच्या दिशेने काम करण्यास सांगितले आहे. देशाची भविष्यातील दिशा ठरवण्याबाबत निर्णय केवळ निवडून आलेले सरकारच घेऊ शकते, असे लष्करप्रमुखांनी अंतरिम सरकारला सांगितले आहे.

Published on: May 23, 2025 10:18 AM