Nashik : ‘साहेब, तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन् महाराष्ट्राला…’,  ठाकरेंच्या सेनेची कळकळीची विनंती, ‘त्या’ बॅनरची होतेय चर्चा

Nashik : ‘साहेब, तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन् महाराष्ट्राला…’, ठाकरेंच्या सेनेची कळकळीची विनंती, ‘त्या’ बॅनरची होतेय चर्चा

| Updated on: Apr 21, 2025 | 6:46 PM

गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे बंधु एकत्र येण्याबाबत चर्चा होता आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित येण्याच्या बॅनरबाजी करण्यात आली आहे. यात राज ठाकरे साहेबांना मातोश्रीचे आमंत्रण द्या असं म्हटलंय

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येण्यासंदर्भात नाशिकमध्ये जोरदार बॅनरबाजी कऱण्यात आली आहे. यातून राज ठाकरेंना मातोश्रीचं निमंत्रण द्या, अशी विनंती उद्धव ठाकरे यांच्याकडे ठाकरेंच्या शिवसेनेतील बाळा दराडे यांनी केली. सध्या नाशिकमधल्या या बॅनरची राज्यभरात चर्चा होताना दिसतेय. या बॅनरवर ‘मा. पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे…आम्हाला आमिष दिले गेले. मोठ्या-मोठ्या ऑफर आल्या… दबाव टाकला… पण साहेब आम्ही डगमगलो नाही. घाबरलो नाही. तुमच्या नेतृत्वाबरोबर आदित्य ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिलो…आता आमची मागणी आहे की तुम्ही स्वतः राज ठाकरे साहेबांना मातोश्रीचे आमंत्रण द्या.. व महाराष्ट्राला आनंदाची बातमी द्या… कळकळीची विनंती साहेब… जय महाराष्ट्र…’, असा आशय छापण्यात आल्याचे पाहायला मिळतंय.

यासंदर्भात बोलताना शिवसैनिकाकडून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना हात जोडून विनंती करण्यात आली आहे. ‘उद्धव साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका आणि राज ठाकरेंना बोलवून घ्या.. त्यांच्याशी चर्चा करा. आपल्याला या गद्दारांना धडा शिकवायचा असेल तर एकत्र येणं गरजेचं आहे’, असं शिवसैनिकांने म्हटलंय.

Published on: Apr 21, 2025 06:46 PM