MNS vs BJP : ‘ही भाजपची भक्ती नव्हे तर…’, हिंदी सक्तीवरून मनसे-भाजपात जुंपली, बॅनरवॉरची एकच चर्चा

MNS vs BJP : ‘ही भाजपची भक्ती नव्हे तर…’, हिंदी सक्तीवरून मनसे-भाजपात जुंपली, बॅनरवॉरची एकच चर्चा

| Updated on: Apr 22, 2025 | 12:20 PM

महाराष्ट्रातील मराठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आता पहिलीपासून ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी इंग्रजीबरोबर आता हिंदी भाषा सक्तीची करण्यात आली आहे. यासंदर्भात भाजपने बॅनर लावल्यानंतर मनसेकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली आहे. हिंदी भाषा सक्तीवरून महाराष्ट्रात अद्याप आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. अशातच या हिंदी सक्तीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षात चांगलीच जुंपली आहे. दादरमध्ये भाजप आणि मनसेमध्ये बॅनरवॉर रंगलंय. भाजपच्या बॅनरला मनसेकडून चोख प्रत्युत्तर देणारा बॅनर लावण्यात आल्याने चांगलीच चर्चा होतेय. हिंदी सक्तीवरून काल भाजपकडून शिवसेना भवनासमोर एक बॅनर लावण्यात आलं होतं. त्यावर ही नव्हे भाषेची सक्ती ही तर महाराष्ट्राची भक्ती.. असं लिहिण्यात आलं होतं. तर यावर उत्तर देताना भाजपच्या बॅनर शेजारीच मनसेने आपलं बॅनर लावलंय. मनसेकडून लावण्यात आलेल्या बॅनरवर हिंदी ही भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती आहे, असं म्हणत भाजपला प्रत्युत्तर देण्यात आलंय. बघा काय म्हटलंय मनसेकडून लावण्यात आलेल्या बॅनरवर…

Published on: Apr 22, 2025 12:20 PM