Nana Patole | बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसचा निर्णय निर्णायक ठरणार; पक्ष जो निर्णय घेईल तो सर्वांना….. नाना पटोलेंची भूमिका काय?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. महायुतीकडून सुनेत्रा पवार रिंगणात असताना काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिल्याने ही लढत चुरशीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विविध पक्षांकडून प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. मात्र काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उमेदवार जाहीर केल्याने इतर पक्षांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. महायुतीकडून सुनेत्रा पवार रिंगणात असताना काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिल्याने ही लढत चुरशीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विविध पक्षांकडून प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. मात्र काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उमेदवार जाहीर केल्याने इतर पक्षांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सुनेत्रा पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना उमेदवार न देण्याची विनंतीही केली होती. तथापि, काँग्रेसने काही मुद्दे पुढे करत उमेदवारी कायम ठेवण्याबाबत विचार सुरू असल्याचे संकेत दिले आहेत.
आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने काँग्रेस अंतिमतः कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संदर्भात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली. “यामध्ये कोणाचंही दुमत असण्याचं कारण नाही. बारामतीसाठी पक्ष जो निर्णय घेईल, तोच आम्हा सर्वांना मान्य असेल,” असे त्यांनी सांगितले. मात्र यापुढे अधिक भाष्य करण्याचे त्यांनी टाळले.
दरम्यान, शेवटच्या क्षणी काही राजकीय घडामोडी घडतात का?, आणि ही निवडणूक बिनविरोध होते की चुरशीची लढत रंगते, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
