Baramati Nagar Parishad Elections : बारामतीत अजित पवार विरुद्ध शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आमनेसामने आले आहेत. एकूण 41 जागांपैकी 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, नगराध्यक्षपदासाठी थेट लढत होत आहे. मतमोजणीला सुरुवात होणार असून, या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, कारण तो दोन्ही पवारांसाठी प्रतिष्ठेचा मानला जात आहे.
बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आमनेसामने उभे ठाकले आहेत. एकीकडे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस तर दुसरीकडे शरद पवार यांच्या पक्षाने योगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली आहे. एकूण 41 जागांसाठी ही निवडणूक झाली असून, त्यापैकी 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. नगराध्यक्षपदासाठी बसपचे उमेदवार काळूराम चौधरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन सातव यांच्यात थेट लढत आहे. मतमोजणीची तयारी बारामती येथील देशपांडे महाविद्यालयात पूर्ण झाली असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली निकाल जाहीर करण्यात येणार आहे. राज्याच्या राजकारणात दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू असतानाच, बारामतीत मात्र हे दोन्ही गट परस्परांविरोधात लढले आहेत. या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.
