Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीत होणाऱ्या सर्वधर्मीय मोर्चाची तारीख बदलली

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीत होणाऱ्या सर्वधर्मीय मोर्चाची तारीख बदलली

| Updated on: Mar 06, 2025 | 6:28 PM

Baramati Protest News : बारामती येथे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वधर्मीय मोर्चा होणार आहे. हा मोर्चा 8 मार्च रोजी होणार होता, त्याची तारीख बदलून आता 9 मार्चला हा मोर्चा होणार आहे.

मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ रविवारी 9 मार्च रोजी बारामतीमध्ये सर्वधर्मीय निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. यापूर्वी हा मोर्चा 8 मार्चला काढण्यात येणार होता. मात्र यात बदल करण्यात आलेला असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी अमरसिंह जगताप यांनी दिली आहे. संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृणपणे त्यांची हत्या करण्यात आलेली होती. या घटनेला 3 महीने पूर्ण होत आहेत. अशी घटना पुनः होऊ नये आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी हा निषेध मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. बारामतीमध्ये होणाऱ्या या सर्वधर्मीय मोर्चात संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख, भाऊ धनंजय देशमुख हे देखील सहभागी होणार आहेत.

Published on: Mar 06, 2025 06:28 PM