Vaibhavi Deshmukh : माझ्या वडिलांना न्याय द्या..; बारामतीच्या मोर्चातून वैभवी देशमुखांची मागणी
Baramati Santosh Deshmukh Morcha : बारामतीत आज संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वधर्मीय मोर्चाचे आयोजन करण्यात आलेला आहे. यावेळी वैभवी देशमुख यांनी बोलताना सीआयडीचा तपास योग्य पद्धतीने सुरू असल्याचं म्हंटलं आहे.
मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि आरोपींना फाशी व्हावी या मागणीसाठी आज बारामतीत सर्वधर्मीय मोर्चा काढण्यात आलेला आहे. या मोर्चात संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख आणि भाऊ धनंजय देशमुख देखील सहभागी झालेले आहेत.
आज संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी ठिकठिकाणी मोर्चे आणि बंदची हाक देण्यात आलेली आहे. बारामतीत देखील कसबा चौक ते भिगवण चौकापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे. यावेळी वैभवी देशमुख म्हणाल्या की, माझ्या वडिलांवर झालेल्या अन्यायावर आम्ही न्याय मागत आहे. आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. सीआयडीकडून तपास योग्य दिशेने सुरू आहे. राहिलेल्या एका आरोपीला देखील त्यांनी लवकर अटक करावी एवढीच मागणी आहे.
Published on: Mar 09, 2025 12:12 PM
