MP Rashid : तिहारमधून थेट संसदेत अन् खासदार हे काय बोलून गेले… एका दिवसाचे दीड लाख भरून आलो
संसदेत अपक्ष खासदार शेख अब्दुल रशीद म्हणाले की मी दररोज दीड लाख रुपये देऊन येथे आलो आहे. मला बोलू द्या, मी एक काश्मिरी आहे. ऑपरेशन सिंदूर माझ्या भागात राबविण्यात आले
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथील अपक्ष खासदार इंजिनिअर शेख अब्दुल रशीद यांना संसदेच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित राहण्याची दिल्ली उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यानंतर, मंगळवारी ते पूर्ण संसदेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेमध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू असताना खासदार इंजिनिअर शेख अब्दुल रशीद मध्यभागी अचानक उभे राहिले आणि त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे बोलण्यासाठी वेळ मागितला. त्यांनी लोकसभा अध्यक्षांना ओरडून सांगितले की ते दररोज दीड लाख रुपये देऊन तिथे आले आहेत आणि त्यांना बोलण्याची परवानगी दिली गेली पाहिजे. मात्र, त्यावेळी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे बोलत होते, त्यामुळे इंजिनिअर रशीद यांना बोलण्याची संधी मिळाली नाही, परंतु नंतर त्यांनी संसदेत आपला मुद्दा मांडला.
Published on: Jul 30, 2025 08:15 PM
