मतदारसंघातील प्रश्नांवर आमदार सुनील टिंगरेंच रस्त्यावर; प्रशासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप

| Updated on: Apr 06, 2023 | 2:54 PM

मतदारसंघातील वाहतूक कोंडी, पाणी प्रश्नांसंदर्भात सातत्याने बैठका, प्रत्यक्ष भेट आणि पत्रव्यवहाराच्या माध्यमातून पाठपुरावा करूनही प्रशासनाचे मागण्यांकडे दुर्लक्ष केलं

Follow us on

पुणे : मतदारसंघात नागरिकांना मुलभूत गरजांसाठी नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने लोक आंदोलनाचा मार्ग अवलंबतात. मात्र जर तेथील आमदारांनाच यासाठी उपोषणाला बसावं लागलं तर. वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे हे मतदारसंघात प्रलंबित कामांसाठी लाक्षणिक उपोषणाला बसले आहेत.

मतदारसंघातील वाहतूक कोंडी, पाणी प्रश्नांसंदर्भात सातत्याने बैठका, प्रत्यक्ष भेट आणि पत्रव्यवहाराच्या माध्यमातून पाठपुरावा करूनही प्रशासनाचे मागण्यांकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे प्रशासनाच्या विरोधात सुनील टिंगरे यांनी आजपासून महापालिकेसमोर उपोषण सुरू केलं आहे. यावरून भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी आमदार टिंगरे यांच्यावर टीका केली आहे.