BDD Chawl Houses :आदित्य ठाकरे मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री उद्या एकाच मंचावर? आदित्य ठाकरेंना भाषणातून डावललं!

BDD Chawl Houses :आदित्य ठाकरे मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री उद्या एकाच मंचावर? आदित्य ठाकरेंना भाषणातून डावललं!

| Updated on: Aug 13, 2025 | 5:35 PM

बीडीडी चाळ पुनर्विकास हा आदित्य ठाकरे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. असे असताना बोलण्याची संधी त्यांना देण्यात आली नसल्याने ते या कार्यक्रमास उपस्थित राहतील का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळाने वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासाअंतर्गत उभारलेल्या दोन पुनर्वसित इमारतींमधील पहिल्या टप्प्यांतील नागरिकांना म्हणजेच ५५६ घरांचे चावी वाटप करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या चाव्या नागरिकांना देण्यात येणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मांटुग्यात पार पडणार आहे. यावेळी स्थानिक आमदार आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित राहणार आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आदित्य ठाकरे एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलं असलं तरी मात्र त्यांना यावेळी भाषणाची संधी देण्यात आली नसल्याची माहिती मिळतेय. उद्याच्या कार्यक्रमातून आदित्य ठाकरेंना भाषणातून डावललं असल्याने ते उद्या हजर राहणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Aug 13, 2025 05:35 PM