Ramdas Athawale | शाहरुख खानचा मुलगा असो की कोणीही, कठोर कारवाई करा : रामदास आठवले

Ramdas Athawale | शाहरुख खानचा मुलगा असो की कोणीही, कठोर कारवाई करा : रामदास आठवले

| Edited By: | Updated on: Oct 03, 2021 | 3:16 PM

ड्रग्ज पार्टी प्रकरणात बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाकडून (NCB) अटक करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आज सकाळपासून माध्यमविश्वात या हायप्रोफाईल केसची चर्चा रंगली आहे. एनसीबीकडून आर्यन खानची कसून चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान, आर्यन खान याला एनसीबीने ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता त्याच्या बचावासाठी दोन वकील मुंबईच्या बॅलार्ड […]

ड्रग्ज पार्टी प्रकरणात बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाकडून (NCB) अटक करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आज सकाळपासून माध्यमविश्वात या हायप्रोफाईल केसची चर्चा रंगली आहे. एनसीबीकडून आर्यन खानची कसून चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान, आर्यन खान याला एनसीबीने ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता त्याच्या बचावासाठी दोन वकील मुंबईच्या बॅलार्ड पियर येथील अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे सरकारी वकील अद्वैत सक्सेनाही याठिकाणी पोहोचले आहेत. त्यामुळे आता एनसीबी आर्यन खानला त्याच्या वकिलांशी बोलून देणार का थेट न्यायालयात दोन्ही पक्षांमध्ये युक्तिवाद रंगणार, हे पाहावे लागेल. एनसीबी आर्यन खानच्या कोठडीची मागणी करणार का, हे पाहावे लागेल. आर्यन खानची रवानगी न्यायालयीन कोठडीत होणार का पोलीस कोठडीत, हेदेखील पाहावे लागेल. आर्यन खानला पोलीस कोठडी सुनावली गेल्यास त्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. शाहरुख खानचा मुलगा असो अथवा आणखी कोणीही, अशा प्रकरणात कठोर कारवाई करा, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

Published on: Oct 03, 2021 02:37 PM