पत्नीवर नजर पडू नये म्हणून घरात डांबलं, पीडित पत्नीची सुटका

| Updated on: Apr 11, 2022 | 11:31 PM

दिसायला सुंदर असलेल्या पत्नीवर कोणाची नजर पडू नये म्हणून एका विकृत पतीने पत्नीसह मुलांना तब्बल दहा वर्षे घरातच डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये उघडकीस आला आहे. मनोज कुलकर्णी असे पत्नीला डांबून ठेवणाऱ्या पतीचे नाव आहे.

Follow us on

दिसायला सुंदर असलेल्या पत्नीवर कोणाची नजर पडू नये म्हणून एका विकृत पतीने पत्नीसह मुलांना तब्बल दहा वर्षे घरातच डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये उघडकीस आला आहे. मनोज कुलकर्णी असे पत्नीला डांबून ठेवणाऱ्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या बहिणीने महिला सामाजिक कार्यकर्त्या आणि पोलिसांच्या मदतीने पीडित महिलेची सुटका केली. तब्बल दहा वर्षे घरात कोंडून राहिल्यामुळे महिलेला धड चालायलाही जमत नव्हते. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने महिलेला बीड शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पीडित महिला पती मनोज कुलकर्णीसमवेत जालना रोड परिसरात राहतात. पीडित महिलेची मोठी बहीण जिल्हा माहिती अधिकारी आहे. त्यांनी बीडमधील सामाजिक कार्यकर्त्या संगीता धसे यांना संपर्क करून हा प्रकार सांगितला. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या संगीता धसे यांनी शिवाजीनगर पोलिसांना घेऊन पीडित महिलेचे घर गाठले आणि पोलिसांच्या मदतीने पीडित महिलेची सुटका केली.