Beed Case Update : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात आणि बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या वाल्मिक कराड याला बीडच्या विशेष मकोका न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात आणि बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या वाल्मिक कराड याला बीडच्या विशेष मकोका न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यापूर्वी वाल्मिक कराड हा जवळपास २१ दिवस पोलीस कोठडीत होता. बीड न्यायालयाने आज वाल्मिक कराडला खंडणी आणि मकोका प्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वाल्मिक कराड याच्यावर मकोका अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी आज न्यायालयात सुनावणी झाली. सीआयडीने आज न्यायालयात संतोष देशमुख हत्याप्रकरण आणि खंडणी प्रकरणाचा प्राथमिक तपास पूर्ण झाल्याची माहिती दिली. यानंतर न्यायालयाने वाल्मिक कराडला १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली. मकोका लागल्यानंतर वाल्मिक कराडला तुर्तास जामीन मिळणे तसं अवघड असताना देखील आता वाल्मिक कराडकडून जामीनासाठी कोणते प्रयत्न केले जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
