Beed Crime : क्षुल्लक कारण…जाब विचारला तर रागच डोक्यात घातला अन् जिवलग मित्राचेच छाटली बोटं

Beed Crime : क्षुल्लक कारण…जाब विचारला तर रागच डोक्यात घातला अन् जिवलग मित्राचेच छाटली बोटं

| Updated on: Jul 31, 2025 | 3:30 PM

बीडमध्ये खून, दरोडा, विनयभंगासारख्या घटना ताज्या असताना आता मित्रानेच मित्राचे बोटे छाटल्याने बीड मध्ये मात्र पुन्हा दहशतीचे वातावरण पसरले आहे.

बीडमध्ये धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. कोयता आणि सत्तुरने एका तरुणाला धमकावून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. हा व्हिडिओ व्हायरल का केला? याचा जाब मारहाण झालेल्या तरुणाने विचारला आणि हाच राग डोक्यात धरून तरुणाच्या हाताचे बोटे छाटण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चार जणांवर पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी शेख अलीम अनिस या तरुणाला चार जणांच्या टोळक्याकडून कोयता आणि सत्तुरने धमकावले जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. या घटनेतील मुख्य आरोपी मारहाण झालेल्या तरुणाचाच मित्र आहे. हा व्हिडिओ इतर मित्रांना का दाखवतो? याचा जाब अनिसने विचारला त्याच्या मित्राने गाडीवर बसवून अज्ञात स्थळी त्याला घेऊन जात जबर मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचे बोट छाटण्यात आले. दरम्यान या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरित तीन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

Published on: Jul 31, 2025 03:30 PM