Satish Bhosale : सतीश भोसलेवर गुन्हा दाखल, मात्र अटक कधी? शिरूरमध्ये जनआक्रोश मोर्चा

Satish Bhosale : सतीश भोसलेवर गुन्हा दाखल, मात्र अटक कधी? शिरूरमध्ये जनआक्रोश मोर्चा

| Updated on: Mar 09, 2025 | 11:07 AM

Beed Shirur Crime News : अमानुष मारहाण प्रकरणी सतीश भोसले याच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतरही अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याने आज शिरूर कासारमध्ये बंद ठेवण्यात आला आहे. तसंच जनआक्रोश मोर्चा देखील काढण्यात आलेला आहे.

सतीश भोसले याला अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याने आज शिरूर कासार बंदची हाक देण्यात आली आहे. भोसलेवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असला तरी त्याला अटक केलेली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. शिरूर कासार पोलीस ठाण्यावर आज जनआक्रोश मोर्चा देखील काढण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे. अमानुष मारहाण प्रकरणी सतीश भोसलेवर गुन्हा दाखल आहे. तो आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. त्याचे काही पैशांचे बंडल उडवतानाचे व्हिडिओ देखील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शेअर केलेले आहे. ट्स विरोधकांकडून देखील सतीश भोसलेला अटक करण्याची मागणी जोर धरत आहे.

Published on: Mar 09, 2025 11:06 AM