Beed Crime News : बीड हादरलं! तरुणाची दगडाने ठेचून हत्या, कन्नापुरमध्ये खळबळ

Beed Crime News : बीड हादरलं! तरुणाची दगडाने ठेचून हत्या, कन्नापुरमध्ये खळबळ

| Updated on: Mar 31, 2025 | 11:39 AM

Beed Kannapur Crime News : बीड जिल्ह्यात आणखी एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे बीडच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कन्नापुर येथे एका तरुणाला दगडाने ठेचून मारण्यात आलं आहे.

बीड जिल्ह्यात गुन्हेगारी थांबण्यास तयार नसून पोलिसांचा धाक उरलेला नसल्याचं पुन्हा एकदा बघायला मिळालं आहे. बीड जिल्ह्यात आणखी एक निर्घृण हत्या झाली असल्याने एकच खळबळ उडाली आहे. बीडच्या कन्नापुरमध्ये एका युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. स्वप्नील देशमुख असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. 2 वर्षांपूर्वी स्वप्नीलच्या मानसिक जाचाला कंटाळून गावातील किराणा दुकानदार अविनाश देशमुख या तरुणाने गळफास घेतला होता. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी स्वप्नीलवर गुन्हा दाखल होता. हा गुन्हा मागे घेण्यासाठी स्वप्नीलकडून अविनाशच्या भावावर दबाव टाकला जात होता. याच कारणामुळे अविनाशचा भाऊ संतोषकडून स्वप्नील देशमुखची हत्या करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

Published on: Mar 31, 2025 11:39 AM