Mahadev Munde Case : गळा कापला, शरीरावर 16 वार… अंगावर काटा आणणाऱ्या पोस्टमार्टम रिपोर्टवर ज्ञानेश्वरी मुंडे एकच म्हणाल्या…
महादेव मुंडे यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती. त्यांची श्वसननलिका कापली होती. मुख्य रक्तवाहिन्या देखील खोलवर झालेल्या वारामध्ये कापल्या होत्या. मानेवर, हातावर, तोंडावर आणि इतर ठिकाणी एकूण 16 वार करण्यात आले होते. चेहरा, छाती, दोन्ही हात आणि शरीराचा इतर भाग रक्ताने माखलेला होता.
बीडच्या परळीतील महादेव मुंडे यांच्या हत्येचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आलाय. महादेव मुंडेंचा गळा कापून तोंड, मान आणि हातावर एकूण १६ वार करण्यात आल्याचे या पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं आहे. अंगावर काटा आणणारी माहिती समोर आल्याने सर्वच हादरून गेलेत. अतिरक्तस्त्राव झाल्याने धक्क्यात जाऊन महादेव मुंडेंचा मृत्यू झाला, असं पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय. यानंतर महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘हा अहवाल इतका वेदनादायी आहे की वाचतानाच डोळ्यात पाणी येत इतक्या क्रूरपणे त्यांची हत्या केली होती. असं असूनही प्रशासन आरोपीची पाठराखण करत आहे. पोलीस अधिक्षकांनी तात्काळ वाल्मिक कराडची चौकशी केली पाहिजे.’, अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडेंनी केली.
Published on: Jul 23, 2025 01:36 PM
