Ambadas Danve : बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये – अंबादास दानवे

Ambadas Danve : बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये – अंबादास दानवे

| Updated on: Apr 20, 2025 | 5:19 PM

बीडमध्ये छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून एका तरुणीने आत्महत्या केली आहे. त्यावर विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये असं, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी म्हंटलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी कदम कारवाई करावी असंही दानवे यावेळी बोलताना म्हणाले. बीडमध्ये छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून एका तरुणीने आत्महत्या केली आहे. आज या तरुणीचं लग्न होतं. मात्र काही नराध्यमांच्या त्रासाला कंटाळून या तरुणीने स्वत:ला संपवलं असल्याने या घटनेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. यावर बोलताना विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तसंच या प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये. राजकीय दबावात येऊ नये असंही म्हंटलं आहे.

Published on: Apr 20, 2025 05:19 PM