वाल्मिक कराड बाबत गौप्यस्फोट करेन म्हणून.. ; रणजीत कासलेचा नवा दावा

वाल्मिक कराड बाबत गौप्यस्फोट करेन म्हणून.. ; रणजीत कासलेचा नवा दावा

| Updated on: May 25, 2025 | 2:43 PM

संतोष देशमुख यांच्या हत्येतला आरोपी वाल्मिक कराड याच्याबाबत बडतर्फ पीएसआय रणजित कासले याने नवे दावे केलेले आहेत.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड बाबत गौप्यस्फोट करेन म्हणून मला बीड कारागृहातून हलवलं होतं. माझ्यामुळे कराडला बीड कारागृहात सुविधा देता आल्या नसत्या, असं बडतर्फ पीएसआय रणजीत कासले याने हा आणखी एक दावा केला आहे.

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याला जेलमध्ये विशेष सुविधा पुरवल्या जातात असे आरोप सातत्याने होतं आहेत. त्यातच आता याच प्रकरणी बडतर्फीची कारवाई करण्यात आलेले पीएसआय रणजीत कासले याने वाल्मिक कराडच्या विरोधात नवा दावा केला आहे. याबद्दलचा व्हिडिओ कासले याने पोस्ट केलेला आहे. माझ्यामुळे कराडला बीड कारागृहात सुविधा देता आल्या नसत्या. मी वाल्मिक कराडबाबत काही गौप्यस्फोट करेल म्हणून मला त्या कारागृहातून हलवण्यात आलं. मात्र मला सुरक्षेच्या कारणाने तिथून हलवलं असं भासवण्यात आलं, असं कासले याने या व्हिडीओमध्ये म्हंटलं आहे.

Published on: May 25, 2025 02:43 PM