माणसं नाहीतर हैवान… देशमुखांना पाईप, वायर अन् लाथा-बुक्क्यांनी मारहाण; क्रूर हत्येचे 15 फोटो अन् 3 व्हिडीओ समोर

माणसं नाहीतर हैवान… देशमुखांना पाईप, वायर अन् लाथा-बुक्क्यांनी मारहाण; क्रूर हत्येचे 15 फोटो अन् 3 व्हिडीओ समोर

| Updated on: Mar 03, 2025 | 5:25 PM

संतोष देशमुख यांच्या हत्येवेळी मारेकऱ्यांनी त्यांच्या मोबाईल मध्ये चित्रिकरण करून त्याचे सेल्फी सुद्धा घेतले. पोलिसांकडील फोटो आणि व्हिडिओ विदारक आहेत की ते पाहताच तूमची तळपायाची आग मस्तकात जाईल...

संतोष देशमुख यांची हत्या कशाप्रकारे झाली याचा सगळा वृत्तांत पोलिसांनी सादर केलेल्या चार्जशीटमधून समोर आला आहे. या आरोपपत्रामध्ये फक्त लेखी पुरावेच नव्हे तर ज्यावेळी हत्या झाली त्यावेळचे फोटो आणि व्हिडिओ देखील पोलिसांनी जोडलेले आहेत. ते व्हिडिओ आणि फोटो प्रत्यक्ष पाहिल्यावर कदाचित एखाद्या राक्षसालाही पाझर फुटेल इतक्या निर्घृणपणे मारेकऱ्यांनी संतोष देशमुख यांची हत्या केल्याचे समोर आले आहे. तर हत्येवेळी मारेकऱ्यांनी त्यांच्या मोबाईल मध्ये चित्रिकरण करून त्याचे सेल्फी सुद्धा घेतले. पोलिसांकडील फोटो आणि व्हिडिओ विदारक आहेत की ते पाहताच तूमची तळपायाची आग मस्तकात जाईल…

फोटो क्रमांक एक

जनावरप्रमाणे मारहाणी नंतर जयराम चाटे संतोष देशमुख यांची पँट काढतोय.

फोटो क्रमांक दोन

त्याच वेळी दुसरा आरोपी महेश केदार हा त्या दृश्याची सेल्फी घेत हैवनासारखा हसतोय.

फोटो क्रमांक तीन

अमानुष मारहाणी नंतर देशमुख अर्धमेल झाले आणि तेव्हा प्रतिक घुले देशमुखांच्या छातीच्या दोन्ही बाजूला पाय टाकून चेहऱ्यावर लघवी करतो.

फोटो क्रमांक चार

संतोष घुले देशमुख यांच्या शेजारी उभा राहून फोटो काढतो. त्यावेळी हैवानी आवेश त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो.

फोटो क्रमांक पाच

मारेकरी जयराम चाटे देशमुखांच्या अंगावरील शर्ट ओरबाडून काढतो. काढलेला शर्ट हातात धरून हसतो.

व्हिडिओ क्रमांक एक

मारेकरी पाईप आणि वायरने देशमुखांवर वार करतात. लाथाबुक्क्यांनी मारहाण आणि शिवीगाळ होते.

व्हिडिओ क्रमांक दोन

वायरीसारख्या हत्यारांचा बंडल देशमुखांच्या पाठीवर मारून वार केले जातात.

व्हिडिओ क्रमांक तीन

ही दृश्य पाहून जल्लाद आणि राक्षसांना सुद्धा पाझर फुटेल पण अशा वेळी महेश केदार सर हसत हसत शूट करतो.

व्हिडिओ क्रमांक चार

मारहाणी नंतर सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे असं देशमुखानी म्हणावं यासाठी त्यांना जबरदस्ती केली जाते.

व्हिडिओ क्रमांक पाच

संतोष देशमुखांना एका अंतरवस्त्रावर बसवून त्यांच्या पाठीवर पाईपने मारहाण होते.

व्हिडिओ क्रमांक सहा

हैवनासारख्या मारहाणी नंतर देशमुखांच्या शरीरातल रक्त उघडून त्यांच्या तळपायापर्यंत आल्याचं दिसतंय.

Published on: Mar 03, 2025 05:25 PM