Puratawn : ‘पुरातन’च्या प्रीमियरवेळी अभिनेत्री पूजा बॅनर्जी म्हणाल्या, ‘एक बंगाली म्हणून अभिमान…’

Puratawn : ‘पुरातन’च्या प्रीमियरवेळी अभिनेत्री पूजा बॅनर्जी म्हणाल्या, ‘एक बंगाली म्हणून अभिमान…’

| Updated on: Apr 19, 2025 | 11:30 AM

अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्या ‘पुरातन’ या बंगाली चित्रपटाचा प्रीमियर अंधेरी येथील पीव्हीआर सिनेमागृहात झाला. या प्रीमियरवेळी बंगाली चित्रपट सृष्टीसह हिंदी चित्रसृष्टीतील कलाकार आणि अन्य मान्यवर हजर होते.

ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी पुरातन या चित्रपटात दमदार अभिनय केल्याचे पाहायला मिळत आहे. तब्बल 14 वर्षांनंतर शर्मिला टागोर यांनी पुरातन या बंगाली चित्रपटाच्या माध्यमातून एन्ट्री घेतली आहे. ‘पुरातन’ या बंगाली चित्रपटाचा प्रीमियर अंधेरी येथील पीव्हीआर सिनेमागृहात झाला. यावेळी बंगाली चित्रपट सृष्टीसह हिंदी चित्रसृष्टीतील कलाकार हजर होते. बंगाली म्हणून अभिमानाचा क्षण असल्याची भावना बंगाली अभिनेत्री पूजा बॅनर्जी हिने व्यक्त केली. लिजेंडरी शर्मिला टागोर यांनी इतक्यावर्षांनंतर बंगाली चित्रपटात त्याचं पुनरागमन होत आहे. एक बंगाली म्हणून आमच्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. त्यांच्या हा चित्रपट पाहण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. इतक्या चांगल्या कलाकारांनी हा चित्रपट बनला आहे तर ती नक्कीच चांगलीच कलाकृती बनलेली असेल, असं म्हणत अभिनेत्री पूजा बॅनर्जीने विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी असंही म्हटलं की, ‘मी त्यांना सपोर्ट करण्यासाठी आले. खूप आनंदाची बातमी आणि की त्यांनी आम्हाला इतका चांगली भेट दिली आहे. आतापर्यंत मी ही मुव्ही पाहिलेली नाही. परंतू जितके या चित्रपटाबद्दल मी ऐकलेले आहे ते चांगलेच ऐकले आहे.’

Published on: Apr 19, 2025 11:30 AM