BEST Bus Accident : मुंबईच्या गिरगावात बेस्ट बस 5 फूट खोल खड्ड्यात पडली अन्… बघा VIDEO

BEST Bus Accident : मुंबईच्या गिरगावात बेस्ट बस 5 फूट खोल खड्ड्यात पडली अन्… बघा VIDEO

| Updated on: Jun 16, 2025 | 11:33 AM

आज सकाळी नऊ ते साडे नऊ वाजेदरम्यान, मुंबईतील गिरगाव परिसरात बेस्ट बसचा एक अपघात झाल्याचे पाहायला मिळाले. बेस्ट बस पाच फूट खोल खड्ड्यात पडली अन्...

मुंबईतील गिरगाव परिसरात मेट्रो स्टेशनजवळ बेस्ट बसचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. गिरगाव येथील मेट्रो स्टेशनजवळ बेस्ट बस खड्डयात पडली आहे. मात्र सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. पण बेस्ट बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. ही बेस्ट बस पाच फूट खोल खड्ड्यात गेली आणि त्यामुळे रस्ताही मोठ्या प्रमाणात खचल्याचे पाहायला मिळाले. या बेस्ट बसचा खड्ड्यात पडल्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आज सोमवारी सकाळी नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गिरगाव चौपाटीजवळील मेट्रोच्या कामासाठी रस्त्याखाली खोदकाम सुरू असताना बेस्ट बस त्या मार्गावरून जात होती. मेट्रोच्या कामामुळे रस्त्याचा काही भाग खचला होता. याच खड्ड्यात बसचा मागील भाग अडकला आणि हा अपघात झाला. दरम्यान, सिमेंटचे रस्ते जे बांधले गेले त्या रस्त्याला बेस द्यायचं असतो. पण टेक्निकली गोष्टी घाईघाईत झाल्यात. रस्त्यांचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. कंत्राटदाराला घाईघाईत काम करायला लावले आणि निकृष्ट दर्जाचं काम झालं. मे महिन्यात पाऊस पडला आणि तरीही कंत्राटदाराला पटापट काम करा असे सांगण्यात आलेले आहे, असे मनसे नेते यशंवत किल्लेदार यांनी सांगितले.

Published on: Jun 16, 2025 10:43 AM