Jaykumar Gore : जयकुमार गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी शेअर केला ‘तो’ व्हिडिओ

Jaykumar Gore : जयकुमार गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी शेअर केला ‘तो’ व्हिडिओ

| Updated on: Mar 31, 2025 | 11:40 PM

Jaykumar Gore's Son Bike Stunt Video : मंत्री जयकुमार गोरे यांच्या मुलाचा स्टंटबाजीचा एक व्हिडिओ भैय्या पाटलांनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. टीकेची झोड उठल्यानंतर आता गोरेंच्या मुलाने हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काढला आहे.

मंत्री जयकुमार गोरे यांच्या मुलाचे बाइक स्टंटबाजी करतानाचे व्हिडिओ समोर आलेले आहेत. भैय्या पाटील यांनी हा स्टंटबाजीचा व्हिडिओ आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. यानंतर सुरू झालेल्या टिकेमुळे आता जयकुमार गोरे यांचा मुलगा आदित्यराज गोरे याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे स्टंटबाजीचे व्हिडिओ डिलीट केले आहेत.

भैय्या पाटील यांनी हा व्हिडिओ ट्विट करत म्हंटलं आहे की, ‘ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा मुलगा आदित्यराज गोरे सातारा – कोल्हापूर रोडवर जीवघेणे स्टंट करून स्वत: सोबत इतर लोकांच्या जीविताला धोका निर्माण करत आहे. या स्टंटचे रील्स लाईव्ह स्वत:च्या सोशल मिडियावर टाकून अशा बेकायदेशीर गोष्टीला प्रोत्साहित केले जात आहे. या बाईकला नंबर प्लेट देखील नाही. जयकुमार गोरेंच्या मुलासाठी महाराष्ट्रात राज्य सरकारने वेगळे नियम बनवले का? असा सवाल देखील भैय्या पाटील यांनी विचारला आहे.

Published on: Mar 31, 2025 11:40 PM