Bhaskar Jadhav : राज्य सरकारची मस्ती सुरूये… निधीवरून भरसभागृहात भास्कर जाधवांचा दादांवर निशाणा

Bhaskar Jadhav : राज्य सरकारची मस्ती सुरूये… निधीवरून भरसभागृहात भास्कर जाधवांचा दादांवर निशाणा

| Updated on: Jul 07, 2025 | 7:47 PM

मूळ अर्थसंकल्पात झाल्यानंतर एखादी अपत्ती आली तर आपल्या राखीव निधीतून पैसे काढावे लागतात. राखीव निधीतून पैसे काढून त्याला मंजुरी मिळवून घेण्याकरता सभागृहात यावं लागतं हे अर्थसंकल्पाचं काम आहे, असं भास्कर जाधव म्हणाले.

जीएसटीच्या पैशांवर राज्य सरकारची मस्ती सुरू असल्याचे म्हणत ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी निशाणा साधलाय. एखाद्या अपत्तीसाठी राखीव निधीला मंजुरी देणं दे अर्थखात्याचं काम असल्याचे म्हणत निधीवाटपावरून भास्कर जाधव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. ‘तुमची मस्ती चालली आहे. तुमच्याकडे जीएसटीचा पैसा तुम्हाला येतो म्हणून मस्ती सुरू आहे. कधी जर जीएसटीचा पैसा नसेल तर राज्याची अवस्था काय होईल?’, असा सवाल भास्कर जाधव यांनी भरसभागृहात केला. पुढे भास्कर जाधव असेही म्हटले की, आर्थिक शिस्त राहिली पाहिजे. आर्थिक शिस्त आणण्यासाठी असेल तर आपला वैयक्तिक काही स्वार्थ असेल तर बाजूला सारून राज्याच्या हिताचा सभागृहात एकमताने निर्णय घेणं गरजेचं असल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटलंय.

Published on: Jul 07, 2025 07:47 PM