Bhiwandi Crime : न्यायालयातून पळाला अन् चिमुरडीच्या नरडीचा घोट घेतला, त्या शैतानाच्या कृत्यानं खळबळ!
भिवंडी न्यायालयातून पळून गेलेल्या सलामत अन्सारी या आरोपीने एका चिमुकलीची अत्याचार करून हत्या केली आहे. सप्टेंबर २०२३ मध्येही त्याने एका सहा वर्षीय मुलीची हत्या केली होती. बिहारमधून अटक झाल्यानंतर ऑगस्ट २०२५ मध्ये तो न्यायालयातून फरार झाला होता. अखेर त्याला पुन्हा अटक करण्यात आली असून, दोन गंभीर गुन्हे समोर आले आहेत.
भिवंडीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भिवंडी न्यायालयातून पळून गेलेल्या एका आरोपीने एका चिमुकलीची अत्याचार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या आरोपीचे नाव सलामत अन्सारी असून त्याला अखेर अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, याच सलामत अन्सारीने सप्टेंबर २०२३ मध्येही एका सहा वर्षीय चिमुकलीची अत्याचार करून हत्या केली होती. या गुन्ह्यात त्याला बिहारमधून अटक करण्यात आली होती. मात्र, ऑगस्ट २०२५ मध्ये तो भिवंडी न्यायालयातून पळून जाण्यात यशस्वी झाला होता. न्यायालयातून फरार झाल्यानंतर आरोपीनं पुन्हा असाच गंभीर गुन्हा केल्याने खळबळ उडाली आहे.
भिवंडी पोलिसांनी अथक प्रयत्नानंतर सलामत अन्सारीला पुन्हा अटक केली आहे. फरार आरोपीने केलेल्या या दुहेरी हत्याकांडाने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. न्यायालयाच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
