Kolhapur Rangoli : कोल्हापुरातील भूषण लोखंडेने काढली श्रीकृष्णाची रांगोळी, गोकुलाष्टमीनिमित्त मनमोहक कलाकुसर

| Updated on: Aug 17, 2022 | 7:35 PM

गोकुळाष्टमीच्या निमित्त कृष्णाची रांगोळी मनमोहक काढल्यामुळे अतिशय कलाकुसर करून त्यांनीही रांगोळी साकारली आहे. त्याच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी त्याला आई-वडील बहिणीचा मोठा पाठिंबा आहे.

Follow us on

कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर शहरातील भूषण लोखंडे याने कोरोनात रांगोळी कशी काढायची याचं प्रशिक्षण घरीच घेतले. त्याने आजपर्यंत शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज, एपीजे अब्दुल कलाम, श्री दत्त महाराज अशा पद्धतीच्या रांगोळी साकारली. दोन दिवसांमध्ये गोकुळाष्टमीच्या निमित्त भूषणने सुमारे 70 तास न थांबता कृष्णाची रांगोळी काढली आहे. ही रांगोळी पाच बाय चारमध्ये काढण्यात आली. ही रांगोळी काढण्यासाठी त्याला सुमारे पाच किलो रांगोळी लागली. कृष्णाचे चित्र रांगोळीच्या स्वरूपात काढले. ही रांगोळी डोळ्याचे पारणे फेडणारी आहे. ही रांगोळी पाहण्यासाठी जिल्ह्यातून नागरिकांनी त्याच्या घरामध्ये मोठी गर्दी केली. गोकुळाष्टमीच्या निमित्त कृष्णाची रांगोळी मनमोहक काढल्यामुळे अतिशय कलाकुसर करून त्यांनीही रांगोळी साकारली आहे. त्याच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी त्याला आई-वडील बहिणीचा मोठा पाठिंबा आहे.