Bihar Election Exit Polls : बिहारमध्ये सत्ता कोणाची? नितीश की तेजस्वी? सर्वांत मोठ्या एक्झिट पोलचे बघा आकडे
बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात विक्रमी ६८% मतदान झाले. विविध एक्झिट पोलनुसार, नितीश कुमारांच्या नेतृत्वाखालील NDA पुन्हा सत्तेवर येण्याची शक्यता आहे, तर तेजस्वी यादव आणि राहुल गांधींच्या महाआघाडीला धक्का बसू शकतो. भाजप, जेडीयू, आरजेडी आणि काँग्रेसच्या जागांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात विक्रमी ६८ टक्के मतदानाची नोंद झाली. या टप्प्यानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलनुसार, बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमारांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार स्थापन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक सर्वेक्षण संस्थांनी भाजप-जेडीयू युतीला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे, तर तेजस्वी यादव आणि राहुल गांधींच्या महाआघाडीला अपेक्षित यश मिळणार नसल्याचे दिसत आहे.
चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार, एनडीएला १३०-१३८ जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर महाआघाडीला १००-१०८ जागा मिळू शकतात. मॅट्रिझने एनडीएसाठी १४७-१६७ जागा आणि महाआघाडीसाठी ७०-९० जागांचा अंदाज दिला आहे. दैनिक भास्करने एनडीएला १४५-१६० जागा, तर महाआघाडीला ७३-९१ जागा मिळण्याचे भाकीत केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली होती. तेजस्वी यादव यांनी सरकारी नोकरीचे आश्वासन दिले होते, तर मोदींनी जंगलराजच्या मुद्द्यावरून महाआघाडीवर हल्लाबोल केला. एकूण मतदारांचा उत्साह पाहता, १४ तारखेला येणारे अंतिम निकाल एक्झिट पोलच्या अंदाजानुसार असतील की त्यात बदल होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
