Bachchu Kadu : बिहारचा विजय हा मशिनचा… निवडणुका मतदान केंद्रावर ठेवण्यापेक्षा भाजपच्या… बच्चू कडूंचा हल्लाबोल
बिहारमधील निवडणूक निकालावर बच्चू कडू यांनी मशीनचा विजय अशी टीका केली आहे, पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दरम्यान, बबनराव तायवाडे यांनी ओबीसी आरक्षणात होत असलेल्या नुकसानीवर चिंता व्यक्त करत न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. मुंबईतही भाजपच्या बॅनरबाजीमुळे राजकीय वातावरण तापले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी देशभरात राजकीय चर्चांना उधाण आले असताना, महाराष्ट्रातूनही त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आमदार बच्चू कडू यांनी बिहारमधील भाजपच्या यशावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे पाहायला मिळत आहे. बच्चू कडू स्पष्ट म्हणाले की , बिहारमध्ये झालेला एनडीएचा विजय हा मशीनचा विजय असल्याची टीका केली आहे.
इतकंच नाहीतर बच्चू कडू यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर शंका व्यक्त केली. बच्चू कडू म्हणाले, “जनतेचा कौल आहे की मशीनची कामगिरी, यात अजूनही स्पष्टता नाहीये. मतदान केंद्रावर निवडणुका घेण्याऐवजी आता मतदान भाजपच्या कार्यालयातच ठेवायला पाहिजे.” त्यांच्या या विधानाने बिहार निवडणुकीतील निकालावर पुन्हा एकदा ईव्हीएमच्या वापरावरून सुरू असलेल्या वादाला तोंड फुटले आहे.
Published on: Nov 15, 2025 11:48 AM
