Bihar Election Results 2025 : बिहार मे का बा? कलांनुसार…फिर एक बार नितीशबा, बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू

Bihar Election Results 2025 : बिहार मे का बा? कलांनुसार…फिर एक बार नितीशबा, बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू

| Updated on: Nov 14, 2025 | 11:20 AM

बिहार विधानसभा निवडणुकीच्या ताज्या कलांनुसार, एनडीए १५३ जागांवर आघाडीवर असून बहुमताकडे वाटचाल करत आहे. महाआघाडी ८३ जागांसह लक्षणीय पिछाडीवर आहे. आरजेडी ६४, काँग्रेस १३ आणि डावे केवळ ४ जागांवर आघाडीवर आहेत. २४१ जागांचे कल हाती आले असून, एनडीएच्या विजयाचे चित्र स्पष्ट होत आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे ताजे कल हाती आले असून, एनडीएने स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. एकूण २४१ जागांचे कल प्राप्त झाले आहेत, ज्यामध्ये एनडीए १५३ जागांवर आघाडीवर आहे, तर महाआघाडी ८३ जागांवर पिछाडीवर आहे. यामुळे दोन्ही आघाड्यांमधील अंतर लक्षणीय वाढले आहे. महाआघाडीमधील प्रमुख पक्षांचा विचार करता, राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) ६४ जागांवर आघाडीवर आहे, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १३ जागांवर पुढे आहे. डाव्या पक्षांना महाआघाडीमध्ये ३५ जागा मिळाल्या होत्या, मात्र सध्या ते फक्त ४ जागांवर आघाडीवर आहेत.

मुकेश सहानी यांच्या व्हीआयपी पक्षाला केवळ २ जागांवर आघाडी मिळाली आहे, ज्यांना महाआघाडीने उपमुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते. एक्झिट पोलचे आकडे आता जुळताना दिसत आहेत, जे एनडीएच्या विजयाचे संकेत देत आहेत. एनडीए आता पूर्ण बहुमतात असल्याचे दिसत आहे, तर महाआघाडीच्या जागा कमी होताना स्पष्टपणे दिसत आहेत.

Published on: Nov 14, 2025 11:20 AM