Bihar Election Results 2025 : NDA आघाडीवर, JDU भाजपपेक्षा पुढे; तेजप्रताप यादव यांना धक्का
बिहार विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीएने आघाडी घेतली असून सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. जेडीयू ७५ जागांवर आघाडीवर असून भाजपपेक्षा पुढे आहे. महुआमध्ये तेज प्रताप यादव पिछाडीवर आहेत, तर तारापूरमधून भाजपचे सम्राट चौधरी आघाडीवर आहेत. हे सुरुवातीचे कल आहेत.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) पुन्हा एकदा बिहारमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट होत आहे. सुरुवातीचे आकडे पाहता, एनडीए १६० जागांवर आघाडीवर असून, महाआघाडी ७९ जागांवर पुढे आहे. एनडीए आणि महाआघाडी यांच्यातील फरक वाढत चालला आहे. एनडीएतील घटक पक्षांमध्ये जनता दल (युनायटेड) (जेडीयू) ७४ जागांवर आघाडीवर असून भारतीय जनता पक्ष (भाजप) ७० जागांवर पुढे आहे, ज्यामुळे जेडीयू भाजपपेक्षा आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
या निवडणुकीत विकासाचे मुद्दे आणि महिलांसाठीच्या योजनांवर विशेष भर देण्यात आला होता. महुआ मतदारसंघातून निवडणूक लढवणारे तेज प्रताप यादव पहिल्या फेरीत केवळ ६८१ मतांसह तिसऱ्या स्थानी आहेत. त्यांनी स्वतःचा जनशक्ती जनता दल (जेजेडी) पक्ष स्थापन करूनही ते पिछाडीवर पडले आहेत. तारापूर मतदारसंघातून भाजपचे सम्राट चौधरी आघाडीवर आहेत. हे केवळ सुरुवातीचे कल असून अंतिम निकालांची प्रतीक्षा आहे.
