Bihar Election 2025 : भाजप अन् ठाकरेंच्या जुन्या मैत्रीत बहार? दिल्लीत नव्या चर्चांना जोर, कनेक्शन थेट बिहार इलेक्शन?
बिहार निवडणूक तोंडावर असल्याने सध्या भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या संबंधात बहार येत असल्याची चर्चा दिल्लीच्या वर्तुळात सुरू आहे. काय आहे नेमक बिहार इलेक्शनचं कनेक्शन?
भाजप पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या सोबतचे संबंध सुधारण्यावर भर देत असल्याची चर्चा आहे. राजधानी दिल्लीमध्ये यावर खलबतं सुरू असून त्यामागे थेट बिहारची निवडणूक केंद्रबिंदू मानली जाते. कारण बिहार निवडणुकीत नीतीश कुमार यांची जेडीयू आणि भाजप सोबत असली तरी यांमध्ये नीतीश कुमार यांच्याबद्दल अंतर्गत नाराजी आहे. मात्र नीतीश कुमार यांच्या नाराजीवरून भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या जवळकीचं कनेक्शन काय या मागच्या आकड्यांचे गणित आणि पार्श्वभूमी जाणून घ्या…
बिहारमध्ये जर पुन्हा भाजप जेडीयूचे सरकार आलं तर नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री पदावर दावा सांगतील. मात्र पुन्हा नीतीश कुमार यांच्या हाती बिहारची सूत्र देण्यास भाजपमधून विरोधी सूर आहे. निकालानंतर भाजपच्या जर जास्त जागा आल्या तरी बिहार सत्तेमध्ये जेडीयूच वर्चस्व राहावं यासाठी नीतीश कुमार यांचे नेते आग्रही आहेत. कारण भाजपच्या केंद्र सरकार या दोन प्रमुख पक्षांच्या आधारावर देशामध्ये सत्तेत आहे. त्यापैकी चंद्रबाबूंचे सोळा आणि नीतीश कुमार यांचे बारा खासदार आहेत. बिहार निवडणुकीत समजा सत्तेचा झगडा झालाच तर प्रत्येक निकालानंतर पलटूराम म्हणून नीतीश कुमारांची खाती आहे. केंद्रातल्या आकड्यांच्या समीकरण बिघडल्यास पूर्वाश्रमीच्या मित्रासोबतच नातं चांगलं असावं. यासाठी दिल्ली भाजपकडून ठाकरे यांच्या सोबतच्या संबंधांवर भर दिला जात असल्याची माहिती आहे. कारण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नऊ खासदार आहेत.
