Anil Parab Video : ‘माझाही छळ, त्यांचा धर्म बदलण्यास अन् माझा…’, अनिल परबांकडून स्वतःची संभाजी महाराजांसोबत तुलना

Anil Parab Video : ‘माझाही छळ, त्यांचा धर्म बदलण्यास अन् माझा…’, अनिल परबांकडून स्वतःची संभाजी महाराजांसोबत तुलना

| Updated on: Mar 07, 2025 | 2:04 PM

काल राज्यपांलाच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान अनिल परब बोलत असताना अनिल परब यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख केला. त्यावेळी त्यांनी राज्यात ठिणगी पडेल असं वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून अनेक मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खंडाजगी होताना दिसत आहे. काल राज्यपांलाच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान अनिल परब बोलत असताना अनिल परब यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख केला. त्यावेळी त्यांनी राज्यात ठिणगी पडेल असं वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले. ‘छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला आणि पक्ष बदलावा म्हणून माझा छळ झाला’, असे वक्तव्य शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केलं आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अनिल परबांनी असं विधान करत त्यांनी स्वत:ची तुलना छत्रपती संभाजी महाराजांसोबत केली. मात्र त्यांच्या या विधानानंतर आता राज्यभरात संतापाचे वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, अनिल परब यांनी स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांशी केल्यानंतर आता त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागण्यात येतंय. भाजपनेही त्यांच्या या विधानानंतर आक्रमक भूमिका घेत त्याविरोधात आंदोलन करणार असल्याची भूमिका घेतली आहे.

असं अनिल परब म्हणाले

संभाजी महाराजांचा विचार, वारसा कोणी चालवला असेल तर ‘छावा’ बघा आणि मलापण बघा. धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला आणि माझा पक्षा बदलावा म्हणून छळ झाला असा आरोप अनिल परब यांनी केला. ईडीची नोटीस, ईडीची कारवाई, सीबीआय, इन्कम टॅक्स.. चांगलचं आहे ना, मी पण तेवढाच कडक आहे ना..! ते राऊत साहेब गेले, थोडे कच्चे निघाले, मी तुम्हाला पुरून उरलो. माझ्यावरती अनन्य अत्याचार झाले आहेत, मी सगळं भोगलेलं आहे, पण मी देखील त्यांचा वारसा जपणारा आहे, त्यांच्या वारशावरती बोलण्याचा हक्क मला असल्याचे परब म्हणाले.

Published on: Mar 07, 2025 01:53 PM