देवेंद्र फडणवीस नव्हे ते तर फसवणीस, कुणाची खोचक टीका?

देवेंद्र फडणवीस नव्हे ते तर फसवणीस, कुणाची खोचक टीका?

| Updated on: Apr 02, 2024 | 5:56 PM

प्रणिती शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस हे कालपर्यंत तर नुसत्या थापाच मारत आलेत. देवेंद्र फडणवीस हे तर फसवणीस आहेत. ते नुसतं म्हणतात करतो करतो मात्र त्यांनी काहीच केलं नाही. भाजपाचे लोकं फक्त आश्वासनांवर आश्वासनं देतात. आम्ही ते करू हे करू सांगतात

काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस हे कालपर्यंत तर नुसत्या थापाच मारत आलेत. देवेंद्र फडणवीस हे तर फसवणीस आहेत. ते नुसतं म्हणतात करतो करतो मात्र त्यांनी काहीच केलं नाही. भाजपाचे लोकं फक्त आश्वासनांवर आश्वासनं देतात. आम्ही ते करू हे करू सांगतात. त्याचं काम फक्त कागदावर असते, असे म्हणत अक्कलकोट येथील प्रचार सभेत आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडून भाजपसह देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधण्यात आल्याचे पाहायला मिळाले तर प्रणिती शिंदे यांनी केलेल्या खोचक टीकेवर राम सातपुते यांनी थेट प्रत्युत्तर दिलं आहे. प्रणिती शिंदेंनी आता विकासाच्या मुद्द्यावर बोलावे काँग्रेसने गेल्या 70 वर्षात जे केले नाही ते भाजपने दहा वर्षात केले आहे. नैराश्य आल्याने प्रणिती शिंदे यांनी फडणवीसांवर अशी टीका केली त्यांनी विकासावर बोलावं असा सल्लाही राम सातपुते यांनी दिला. त्यांना चिडचिड व्हायला लागली आहे त्यामुळे मी त्यांच्यावर बोलणार नाही आम्ही विकासाच्या मुद्द्यावर मोदी सरकारने जी कामे केली त्याच्यावरच आम्ही मते मागणार आहोत, असे त्यांनी म्हटले.

Published on: Apr 02, 2024 05:56 PM