‘हताश भाषणावर आणि टोमण्यांवर प्रतिक्रिया देणं…’, उद्धव ठाकरे यांच्या आक्रमक भाषणाची देवेंद्र फडणवीसांकडून खिल्ली
VIDEO | उद्धव ठाकरे यांच्या आक्रमक भाषणाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खिल्ली, बघा काय म्हणाले...
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या खेडमधील आक्रमक भाषणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या सभेतून काहीही नवीन मिळालेलं नाही. ते तेच तेच बोलले आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देणं मला योग्य वाटत नाही, असे ते म्हणाले. तेच शब्द, तीच वाक्य, तेच टोमणे, काहीही नवीन या सभेमधून मिळालं नाही. त्यांच्या नाकाखालून 40 लोकं निघून गेल्याचा संताप आणि निराशा, या दोन्ही गोष्टींमुळे त्यांच्या भाषणामध्ये केवळ हताशा आपल्याला पाहायला मिळत होती. अशा हताश भाषणावर आणि टोमण्यांवर कुठलीही प्रतिक्रिया देणं मी योग्य समजत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी देत उद्धव ठाकरे यांच्यावर भाषणावर खिल्ली उडवली.
Published on: Mar 05, 2023 11:52 PM
