Uddhav Thackeray | मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानावर चंद्रकांत पाटील, नारायण राणेंच्या प्रतिक्रिया

| Updated on: Sep 17, 2021 | 8:10 PM

मला माजी मंत्री म्हणू नका. पुढच्या दोन-तीन दिवसांत बघा काय होतंय, असं म्हणून चंद्रकांत पाटील यांनी राज्याच्या राजकारणात भूकंप केला होता. चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचे कालपासून अर्थ अन्वयार्थ लावले जात होते.

Follow us on

YouTube video player

औरंगाबाद :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा खरोखर वादळी ठरला. मराठवाडा मुक्तीदिनाच्या पार्श्वभूमीवर भाषण करताना त्यांनी मराठवाड्यासाठी लोकप्रिय घोषणा केल्या, विरोध करणाऱ्या एमआयएमला उत्तर दिलं, तर चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर जोरदार टोला लगावला. मला कळलंय की चंद्रकांत पाटील तिन्ही पक्षापैकी एका पक्षात प्रवेश करतायत, असं ते म्हणाले. मला माजी मंत्री म्हणू नका. पुढच्या दोन-तीन दिवसांत बघा काय होतंय, असं म्हणून चंद्रकांत पाटील यांनी राज्याच्या राजकारणात भूकंप केला होता. चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचे कालपासून अर्थ अन्वयार्थ लावले जात होते. शिवसेना-भाजप एकत्र येणार असल्याच्या चर्चाही होत होत्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज औरंगाबाद दौऱ्यात मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी मिश्किल उत्तर दिलं. यावर चंद्रकांत पाटलांनीही प्रतिक्रिया दिली आहे.  त्यांच्या मनात काय आहे हे ओळखायला एवढा मी मनकवडा नाही, असे पाटील म्हणाले.