Chitra Wagh | मालिकेतून काढल्यानं किरण मानेनं नाटक उभं केलं : चित्रा वाघ
‘मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीशी किरण मानेने गैरवर्तन केलं. म्हणून त्याला प्रोडक्शन हाउसनं हाकलून दिलं. त्यानंतर मानेनं नवं नाट्य उभं केलं’, असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय. ‘किरण मानेचा बोलवता धनी कोण?’, असा सवालही त्यांनी विचारला आहे. ‘या सोंगाड्यावर कारवाई करा, त्याला शिक्षा झालीच पाहीजे, असंही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
मुंबई : किरण माने (kiran mane) या नावाने मागच्या काही दिवसांपासून टीव्ही जगत व्यापून टाकलंय. या सगळ्या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रियादेखील उमटत आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ (bjp leader chitra wagh) यांनीही किरण माने यांच्यावर कठोर शब्दात टिका केली आहे. ‘मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीशी किरण मानेने गैरवर्तन केलं. म्हणून त्याला प्रोडक्शन हाउसनं हाकलून दिलं. त्यानंतर मानेनं नवं नाट्य उभं केलं’, असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय. ‘किरण मानेचा बोलवता धनी कोण?’, असा सवालही त्यांनी विचारला आहे. ‘या सोंगाड्यावर कारवाई करा, त्याला शिक्षा झालीच पाहीजे, असंही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
