… तर मी ‘सामना’त एक महिना नोकरी करेन, नितेश राणे यांचं संजय राऊत यांना ओपन चॅलेंज
'ज्याला त्याच्याच घरचे लोक डाऊटमध्ये बघतात, असा डाउटफुल माणूस संजय राऊत देवेंद्र फडणवीस साहेबांवर टीका करतो हे हास्यास्पद आहे. हा 2024 चा फार मोठा विनोद आहे.' भाजप नेते आमदार नितेश राणे यांची ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका
मुंबई, १५ जानेवारी २०२४ : ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे तर महाराष्ट्रातील डाऊटफूल सरकारची नाही, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे सरकारवर टीका केली. तर या टीकेला भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘ज्याला त्याच्याच घरचे लोक डाऊटमध्ये बघतात, असा डाउटफुल माणूस संजय राऊत देवेंद्र फडणवीस साहेबांवर टीका करतो हे हास्यास्पद आहे. हा 2024 चा फार मोठा विनोद आहे.’ असं नितेश राण म्हणाले. तर संजय राऊत जर खरंच राजारामचा पोरगा असेल तर राम मंदिर आंदोलनात त्याने उद्धव ठाकरे आणि स्वतःचा एक तरी पुरावा दाखवावा. तू बोलशील ते मी करेन. सामनामध्ये एक महिना नोकरी करेन, असे वक्तव्य करत थेट नितेश राणे यांनी चॅलेंज दिलंय. मातोश्रीमध्ये राहणारे उद्धव ठाकरे ज्याला मानेवर बसलेला मच्छर मारता येत नाही. मुल्ला उद्धव ठाकरेजवळ वाकड्या नजरेने कोण पाहिलं. तो फोन पाटणकरांच्या घरातून केलेला असेल. या बंटी बबली वर विश्वास ठेवू नका, असे म्हणत खोचक टोलाही नितेश राणे यांनी लगावला आहे.
