Narayan Rane Live | संजय राऊत शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे? : नारायण राणे

| Updated on: Dec 11, 2021 | 6:47 PM

शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर नारायण राणे यांनी टीका केलीय. ते शिवसेनेचे की राष्ट्रवादी(NCP)चे असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. दिल्लीत ते राष्ट्रवादीच्याच कार्यालयात असतात. त्यांना शिवसेनेविषयी कोणतीही निष्ठा नाही, प्रामाणिक नाही. ते कधी होते शिवसेनेत, काय केलं पक्षासाठी, असा सवाल त्यांनी केलाय.

Follow us on

YouTube video player

मुंबई : आकडेवारीसह न पाहता उत्तर दिलं. कोरोनात कारखान्यांच्या स्थितीबाबत तो प्रश्न होता, असं स्पष्टीकरण भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (BJP Leader Narayan Rane) यांनी दिलंय. डीएमके नेत्या कनिमोळी (Kanimozhi) यांनी लोकसभे(Loksabha)त त्यांना कोरोना परिस्थितीत उद्योग क्षेत्र आणि त्यांचे चालक यासंबंधी प्रश्न इंग्रजीतून विचारला होता. मात्र प्रश्नाचं उत्तर देताना राणे अडखळले. यावरून शिवसेने(Shiv Sena)नं त्यांना लक्ष्य केलं होतं. शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर नारायण राणे यांनी टीका केलीय. ते शिवसेनेचे की राष्ट्रवादी(NCP)चे असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. दिल्लीत ते राष्ट्रवादीच्याच कार्यालयात असतात. त्यांना शिवसेनेविषयी कोणतीही निष्ठा नाही, प्रामाणिक नाही. ते कधी होते शिवसेनेत, काय केलं पक्षासाठी, असा सवाल त्यांनी केलाय. ते बोलतात तसे नाहीत. एका खासदाराला, वृत्तपत्राच्या संपादकाला अशाप्रकारची भाषा शोभत नाही, असा हल्लाबोल त्यांनी केलाय. एसटी कर्मचारी संपा(ST Workers Strike)वरून त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab)यांच्यावरही टीका केली.