Prasad Lad : संजय राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं त्यांचं काम… भाजपच्या नेत्याचा घणाघात
संजय राऊतांनी नरकातला स्वर्ग या पुस्तकातून देशाच्या राजकारणामध्ये खळबळ उडवणारे काही गौप्यस्फोट केले. यावरून राजकीय वर्तुळातील अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत.
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांनी कायद्याच्या चौकटीबाहेर मोदी-शहांना मदत केल्याचा गौप्यस्फोट संजय राऊतांनी नरकातला स्वर्ग या पुस्तकातून केलेला आहे. यावर भाजप नेते प्रसाद लाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘संजय राऊत हे उलट्या पायाचे बांडगुळ आहे. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी काहीना काही रोज नवं करत राहायचं याच्या पलिकडे संजय राऊत यांच्याकडे काही उद्योग नाहीत.’, असं म्हणत भाजपच्या प्रसाद लाड यांनी संजय राऊत यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली. पुढे ते असेही म्हणाले, ‘नरकातला स्वर्ग हे पुस्तक लिहिताना संजय राऊतांना एक सांगायचंय की, १४ वर्ष ज्या पत्राचाळीतील गोर गरिबांना नरकात ठेवण्याचं काम केलंय त्यावर एक पुस्तक लिहिलं असतं तर बरं झालं असतं’, असा खोचक सल्ला देखील प्रसाद लाड यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे संबंध काय होते? याची पोचपावती शरद पवार यांच्या घरात भांडे घासणाऱ्या संजय राऊत यांनी देण्याची गरज नाही, असे म्हणत प्रसाद लाड यांनी चांगलंच फटकारल्याचे पाहायला मिळाले.
