भरती परीक्षा घोटाळ्यांचे धागेदोरे मंत्रालयात कोणाकडे जातात हे शोधून काढायची गरज-Pravin Darekar

भरती परीक्षा घोटाळ्यांचे धागेदोरे मंत्रालयात कोणाकडे जातात हे शोधून काढायची गरज-Pravin Darekar

| Edited By: | Updated on: Dec 20, 2021 | 8:36 PM

पोलिसांनी सुपे आणि त्याच्या मेहुण्याच्या घरावर छापा टाकला असता मोठं घबाड हाती लागलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्याची मागणी विरोधक करत आहेत.

मुंबई : राज्यातील विविध परीक्षेतील मोठा घोटाळा (Exam Scam) आता समोर आला आहे. आरोगय भरती प्रक्रियेतील पेपर फुटीनंतर (Paper Leak) पुणे पोलिसांनी त्याचा तपास सुरु केला. त्यावेळी म्हाडाचा पेपर फोडल्याचं प्रकरण समोर आलं. याचा तपास सुरु असताना आता महा टीईटी परीक्षेतील मोठा गैरप्रकार समोर आला आहे. पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपेला (Tukaram Supe) अटक केली आहे. पोलिसांनी सुपे आणि त्याच्या मेहुण्याच्या घरावर छापा टाकला असता मोठं घबाड हाती लागलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्याची मागणी विरोधक करत आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही त्याबाबत आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे.