एका केसमध्ये क्लिनचीट मिळाली, म्हणजे पूर्ण केसमधून सुटका झाली असं नाही

| Updated on: Sep 09, 2021 | 8:36 PM

छगन भुजबळ यांच्यावर अनेक केसेस आहेत त्यापैकी खालच्या कोर्टाने कुठला निकाल दिलाय यावर सर्व अवलंबून असून अनिल देशमुख प्रकरणातही दिवसभर अनेक गोष्टी घडल्या. मात्र मोठे षडयंत्र पुढे आले होते याची आठवण त्यांनी करून दिली.

Follow us on

YouTube video player

चंद्रपूर : भुजबळांच्या क्लिनचीट बातमीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोर्टाने नक्की कशाबाबत निकाल दिला? याबाबत माहिती घ्यावी लागेल असे विधान त्यांनी केले आहे. हे नेमके सीबीआय-एसीबी-ईडी कुणी दाखल केलेले प्रकरण होते, याबाबत माहिती घेऊन वक्तव्य करणे योग्य असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. ही अंजली दमानिया यांनी दाखल केलेली केस असेल तर त्यांनी व्यक्तिगत निर्णय घ्यायचा आहे, अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली आहे. छगन भुजबळ यांच्यावर अनेक केसेस आहेत त्यापैकी खालच्या कोर्टाने कुठला निकाल दिलाय यावर सर्व अवलंबून असून अनिल देशमुख प्रकरणातही दिवसभर अनेक गोष्टी घडल्या. मात्र मोठे षडयंत्र पुढे आले होते याची आठवण त्यांनी करून दिली. एखाद्या केसमध्ये निर्दोष मुक्तता असेल तर भुजबळ यांना पूर्ण क्लीन चिट मिळाली असे मानण्याचे कारण नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.