Sudhir Mungantiwar Video : ‘मेरी कुर्सी छिनी गई…’, मंत्रिपद हुकल्याची सल कायम? मुनगंटीवार जाहीरपणे म्हणाले, ‘पंतप्रधानांची खुर्ची मी…’

Sudhir Mungantiwar Video : ‘मेरी कुर्सी छिनी गई…’, मंत्रिपद हुकल्याची सल कायम? मुनगंटीवार जाहीरपणे म्हणाले, ‘पंतप्रधानांची खुर्ची मी…’

| Updated on: Feb 21, 2025 | 5:32 PM

मेरी कुर्सी छिनी गई, असं वक्तव्य सुधीर मुनंगटीवार यांनी केलं. ते चंद्रपूर येथील एका कार्यक्रमात बोलत होते. चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लबच्या उद्धाटन कार्यक्रमात सुधीर मुनंगटीवार बोलत होते. या वक्तव्यावरून मंत्रिपद न मिळाल्याने सुधीर मुनंगटीवार अद्याप नाराज असल्याचे दिसतंय.

भाजप नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांची खदखद पुन्हा एकदा बाहेर आल्याचे पाहायला मिळाले. मेरी कुर्सी छिनी गई, असं वक्तव्य सुधीर मुनंगटीवार यांनी केलं. ते चंद्रपूर येथील एका कार्यक्रमात बोलत होते. चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लबच्या उद्धाटन कार्यक्रमात सुधीर मुनंगटीवार बोलत होते. या वक्तव्यावरून मंत्रिपद न मिळाल्याने सुधीर मुनंगटीवार अद्याप नाराज असल्याचे दिसतंय. तर मंत्रिपद न मिळाल्याची सल सुधीर मुनंगटीवार यांच्या मनात अद्याप कायम आहे का? अशी सवाल सध्या चर्चेचा विषय ठरतोय. चंद्रपूर येथे भाजप नेते राजीव प्रताप रूडींच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या फ्लाईंग क्लबच्या उद्घाटनानिमित्ताने झालेल्या जाहीर कार्यक्रमात सुधीर मुनंगटीवार यांनी मंत्रीपद न मिळाल्याची खंत व्यक्त केली, तर माझी खुर्ची गेली पण पंतप्रधान ज्या खुर्चीवर बसतात ती खुर्ची येत्या सहा महिन्यात माझ्या मतदारसंघातून बनवून दिली जाणार असल्याचे त्यांनी म्हटलं. दरम्यान, सुधीर मुनगंटीवारांच्या नाराजीवर जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य करत कोणी खुर्ची घेतली हे त्यांनी सांगाव, आम्हाला काय माहीत त्यांची खुर्ची कधी कोणी घेतली. आम्ही थोडी आत्मज्ञानी आहोत, महाराष्ट्राला सांगा कोणी तुमची खुर्ची खेचली? असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी सुधीर भाऊंना खोचक सवाल केला.

Published on: Feb 21, 2025 05:31 PM