BJP-राष्ट्रवादी युतीवर भाजप नेत्यांचं वक्तव्य

BJP-राष्ट्रवादी युतीवर भाजप नेत्यांचं वक्तव्य

| Updated on: Apr 28, 2022 | 8:33 PM

राष्ट्रवादीसोबत युती न करणे, ही चूक होती का? असे विचारता ती चूक नव्हती. शिवसेनेसोबत जाणे, ही चूक झाली, असं मुनगंटीवार म्हणाले.

चंद्रपूर: शिवसेनेसोबत (shivsena) युती करण्यावरून भाजप नेते सुधीर मुनंटीवार (sudhir mungantiwar) यांनी मोठं विधान केलं आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत युती करावी असं एका गटाचं म्हणणं होतं. हा गट राष्ट्रवादी काँग्रेससोबत (ncp) युती करण्याच्या बाजूचा होता. मात्र त्यासाठी मित्रपक्ष आणि विचारसाम्य असलेली शिवसेना आपण सोडायची कशी? असा विचार पुढे आला. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत युती करण्याचा विचार बाजूला सारला गेला. ती आमची चूक होती, असे आता वाटू लागले असून या चुकीतून बोध घेत पुढील निवडणुकीत स्वबळावर विजय मिळवू, असा निर्धार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. मुनगंटीवार यांच्या या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिवसेने आधीही भाजपमध्ये राष्ट्रवादीसोबत युती करण्याचं घटत होतं का? असा सवालही या निमित्ताने व्यक्त केला जात आहे.